वरवंड, दि. १४ (वार्ताहर) : वरवंड (ता. दौंड) येथील औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचा निकाल ९८ टक्के लागला.
दरम्यान, ट्रेड अभ्यासक्रमानुसार निकाल असा : संधाता (वेल्डर) १००, यांत्तिकी (मोटरगाडी) ९५, तारतंत्री (वायरमन) १००, वीजतंत्री (इलेक्ट्रिकल्स) १००, हेअर अँड स्किन केअर ९३ टक्के. तसेच, तांत्तिक परीक्षेत उल्लेखनीय यश संपादित केलेल्या विद्यार्थ्यांची नावे अशी : प्रवीण दुरगुडे ७८ (सांधता, प्रथम), विकास जराड ८३.२ (यांत्तिकी मोटारगाडी, प्रथम), सचिन दोरड ७९ (तारतंत्री, प्रथम), प्रसाद रायकर ८७ (वीजतंत्री, प्रथम). यशस्वी विद्यार्थ्यांचे प्राचार्य शिवाजी कोंढापुरे यांनी अभिनंदन केले. २००८नंतर या संस्थेत आमूलाग्र बदल घडून १२ वेगवेगळी युनिट सुरू करण्यात आली आहेत. तसेच, प्रशिक्षित विद्यार्थ्यांसाठी सुसज्ज कार्यशाळा उभारण्यात आली असून, पर्यावरणाच्या दृष्टीने संस्थेच्या इमारतीभोवती वृक्षलागवड करण्यात आली आहे.
या संस्थेच्यावतीने नेहमीच सामाजिक उपक्रम राबविले जातात. याकामी संस्थेच्या कर्मचाऱ्यांचे नेहमीच सहकार्य मिळत असल्याचे प्राचार्य शिवाजी कोंढापूरे यांनी सांगितले